करमाळा प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त दिलमेश्वर ता.करमाळा जि‌. सोलापूर येथे वारसा मी चळवळीचा या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख

उपस्थिती म्हणून आलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक जिल्हाध्यक्ष यशपाल दादा कांबळे यांनी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करत असताना यशपाल दादा कांबळे यांनी सांगितले की, खरंच आधुनिक चळवळीच्या नव्या

पर्वाची सुरुवात दिलमेश्वर येथेनु सुरू झाली आहे. असे मी जाहीर करतो व हे दादांचे भाषणं चालु असताना अचानक दिलमेश्वरच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांनी दांदांकडे मांडला त्या वेळी यशपाल कांबळे यांना धक्का बसला

त्यांनी त्यांचे भाषणं थांबवुन शासकिय अधिकारी यांना सर्व नागरिकांना समोर फोन करुन पाणी का बंद ठेवले असे विचारले आणि दोन दिवसांत पाणी चालु नाही झाले तर आम्हाला वेगळी भुमिका घ्यावी लागेल असा इशारा या त्यांनी दिला लवकरच

दिलेश्वर चे पाणी चालु करू असे आश्वासन दादांमुळे मिळाले आहे. या वारसा मी चळवळीचा या ऐतिहासिक कार्यक्रमात ज्ञानाची शिदोरी सोडताना यशपाल दादा कांबळे व विशाल भाऊ लोंढे आणि सर्व महिलांच्या हस्ते ज्ञानाची शिदोरी सोडण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन पठाण सर यांनी केले. यावेळेस दिलमेश्वर सर्व नागरिक उपस्थित होते.

सतिश राक्षे, वैभव मस्के, अशोक नगरे, प्रकाश राक्षे, विनोद मारकड, राजेंद्र मल्लाव, नितीन मोरे, विजय शेवंते, महिलांपैकी रेश्मा राक्षे, सुवर्णा नगरे,विद्या मारकड, जुलेखा, ऊशा चव्हाण पठाण, बायसाबाई राक्षे व इत्यादी मान्यवर उपस्थित अतुल राक्षे यांच्या स्वाभिमानी संघर्ष निधीतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *