ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांना शिस्त कधी लागणार ,आर टी ओ घेतो बघ्याची भूमिका

करमाळा शहराकडून पुण्याला जाताना रोशेवाडीनंतर मोठा चढ सुरू होतो या चढावरती ट्रॅक्टर ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टर हे सहजासहजी तो चढ पास करू शकत नसल्यामुळे ट्रॅक्टर चालक हे उसाच्या ट्रॉलीला मोठमोठ्या दगडाच्या उटी लावून ट्रॅक्टर

पुढे घेतात.. परंतु ट्रॅक्टर जेव्हा पुढे जातो त्यावेळेस त्या रस्त्यावर पडलेले दगड आहेत तशीच ते तिथे टाकून निघून जातात.
आज पर्यंत करमाळा तालुक्यात बेशिस्त ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांनी मुळे अनेकांचे बळी घेतलेले असून कित्येक जण जखमी झालेले आहेत .तर कित्येक जणांना कायमचं अपंगत्व आलेले आहे.दोन दोन ट्रॅक्टर लावणे नियमात बसत नाही तरी सुधा आर टी ओ घेतो बघ्याची भूमिका मोठी शोकांतिका आहे


चढावरती रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात मोठे दगड पडलेले असतात .त्यामुळे कित्येक अपघात होतात ट्रॅक्टर चालक हे ट्रॅक्टर चालवताना करणकर्कश्य आवाजात गाणे लावतात . काहीजण ट्रॅक्टर प्रचंड वेगाने चालवतात परंतु या ट्रॅक्टर चालकांना हे का कळत नसेल की आपल्या अशा चुकीच्या वागण्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो.. एक साईडने तीव्र उतार व

एक साईडने पूर्ण चढ असल्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड असतो अपवाद मोठी वाहने वगळता लहान कारचालक असतील किंवा दुचाकी स्वार असतील या रस्त्यावर पडलेल्या दगडांमुळे मोठे अपघात होऊन जीवित हानी होते..
तरी कृपया अशा बेशिस्त ट्रॅक्टर चालकांना वरती पोलीस प्रशासनाने वेळीच कार्यवाही केल्यास असे अपघात टाळले जाऊ शकतील.

प्रतिक्रिया ….. मी सकाळी माझ्या खाजगी वाहनाने कुटुंबातील सदस्यांना घेऊन पुण्याला निघालो होतो . करमाळ्यावरून पुण्याकडे निघालो असताना रोशेवाडीच्या चढावरती प्रचंड प्रमाणात दगड पडलेले होते . अचानक समोर दगड दिसल्यामुळे मी माझी गाडी कंट्रोल केली. परंतु त्यातील दगड माझ्या टायर खाली येऊन माझ्या गाडीच्या इंजिनला वेगात धडकला त्यामुळे इंजिनच्या वरील आवरण अक्षरशा तुटून पडले मी वेळीच गाडी कंट्रोल केल्यामुळे पुढील धोका टळला …श्री कुंभार

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *