आगामी विधानसभा निवडणुकीत प्रा शिवाजीराव बंडगर सर उभा राहणार आहे – प्राचार्य टकले
करमाळा प्रतिनिधी


आगामी करमाळा विधानसभा निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सरांनी लाढवावी अशी माहिती आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ अभिमन्यू टकले यांनी दिली आहे.
प्राध्यापक बंडगर सरांचा पूर्वीपासूनच चळवळीमध्ये सहभाग आहे.तालुक्यातील विजेचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, तालुक्यातील रस्ते, आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठमोठे आंदोलने त्यांनी तालुक्यात उभा केली होती. तसेच विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नामांतरण ,उजनी धरणग्रस्तांसाठी आंदोलने ,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून

शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न केला आहे. बंडगर सर पूर्ण तालुक्याला परिचित आहे आहे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.आजी माजी आमदारांना वारंवार संधी देऊ नका नवीन उमेदवारांना संधी द्या त्या संधीचे नक्कीच ते सोनं करतील घराणेशाही संपवून टाका सर्व बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यासाठी आवश्यक ते सहकार्य तालुक्यातील व महाराष्ट्रातील नागरिक बंडगर सरांना करतील असेही अखेर टकले यांनी सांगितले आहे यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील काही समर्थक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *