करमाळा  प्रतिनिधी

साम्राज्य आरमार युवक संघटना प्रणित कुर्डूवाडी शहर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची पूर्व नियोजन बैठक (दि. 06 फेब्रुवारी 2024) संपन्न झाली. सदरील बैठकीमध्ये मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीमध्ये जमलेल्या हजारो शिवप्रेमींच्या मार्फत नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष

म्हणून रेल्वे कामगार नेते महेंद्र जगताप तर उपाध्यक्षपदी अभिजीत सोलंकर आणि पिनू गोरे यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून सचिन पांढरे तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून संग्राम गवळी, सौरभ परबत, विजय देवकते, सनी इंगोले, सागर तरंगे व ईश्वर कसबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदरील बैठकीची प्रस्तावना विक्रमसिंह परबत यांनी तर

सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले. बैठकीला संबोधित करताना जेष्ठ मार्गदर्शक हनुमंत कडबाने, गतवर्षीचे अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी शिवजयंती मोहत्सव कसा साजरा करावा या विषयी सुचना सुचवल्या. साम्राज्य आरमार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी यावेळीची होणारी शिवजयंती ही अभूतपूर्व होणार असून सोलापूर

जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक करणारे दीड हजार लोकांचे रक्तदान होणार अशी ग्वाही दिली. तसेच 21 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक कुर्डूवाडी शहरातील मुख्य मार्गावरून निघणार असून या मिरवणूक सोहळ्या साठी माढा तालुक्यातील तमाम शिवभक्तांनी  उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले. सदरील बैठकीला हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *