करमाळ्यात तुरीला उच्चांकी १००६६ रु . प्रतिक्विंटल दर : माजी आमदार जयवंतराव जगताप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शुक्रवारी तुरीला उच्चांकी १०,०६६ रु . प्रतिक्विंटल दर मिळाला असून शेतकऱ्यांनी आपली तूर करमाळा बाजार समितीत विक्रीस आणावी असे आवाहन माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती

जयवंतराव जगताप यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी आ. जगताप यांनी सांगितले कि, शुक्रवारी करमाळा येथे पांढऱ्या तुरीची तब्बल २००० कट्टे आवक झाली असून १००६६ /- रू प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला असून सरासरी ९८०० / – रू . तुरीला दर मिळाला आहे. त्याचबरोबर ज्वारीला कमाल ५४८१ / – सरासरी ४२०० / – रु . दर व

हरभऱ्याला कमाल ५००१ / – सरासरी ४८५१/- दर मिळाला आहे. करमाळा बाजार समितीचा गेली ७५ वर्षापासून भुसार शेतमाल विक्रीसाठी विश्वसनीय बाजार पेठ म्हणून आसपासच्या ४ते ५ जिल्ह्यात लौकिक आहे . शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव, २४ तासात मापे व मालविक्रीची पट्टी मिळत असल्यामुळे करमाळ्यात तुर, ज्वारी, उडीद, हरभरा, मका, बाजरीची

आवक मोठ्या प्रमाणात होते. चालू हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *