जेआरडी माझा

करमाळा, माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रि्याबद्दल कोंढार चिंचोली ता. करमाळाचे मा. सरपंच  व आर टी आय कार्यकर्ता यांनी दि. 23/12/2023 रोजी सर्व वरिष्ठ अधिकार, मा. कक्ष अधिकारी, विभागीय आयुक्त, मा. जिल्हाधिकारी, सोलापूर मा. पोलीस अधिक्षक इ. ना लेखी पत्रे टाकून सोशल मीडिया, सर्व पत्रकार मंडळी करमाळा, इंदापूर, कर्जत, दौड यांनीही

या कामी आवाज उठवीला तसेच मा. दत्ता भाऊ मस्के सोलापूर प्रहार अध्यक्ष व त्यांची सर्व टीम यांनी काल मा. जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून या कामी पारधर्शी निवड प्रक्रिया झाली पाहिजे असा आग्रह धरला आणि मा. जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत पोलीस पाटील भरती प्रकियेला स्थागिती देऊन सदरच्या तोंडी मुलाखती घेऊ नये अशे सांगितले

आहे. या कामी सामाजिक कार्यकर्ता व आर टी आय कार्यकर्ते मा. देविदास आप्पा साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने सर्व गावांचे पोलीस पाटील पदाचा शर्यतीतील उमेदवार यांनी साळुंके यांना धन्यवाद दिले आहेत. पुढील निवड प्रक्रिया पारदर्शी

करणेकामी देविदास आप्पा साळुंके, व मा. दत्ता भाऊ मस्के जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर हे संयुक्त जिल्हाधिकारी सोलापूर व वरिष्ठ अधिकारी याचेकडे कायदेशीर बाजू मांडून  प्रयत्न करणार आहेत. पोलीस पाटील भरती संबधी काही शंका,

तक्रारी असल्यास साळुंके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *