झरे जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी

श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे व बीसीए कॉलेज झरे येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी केली. गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान शाळेमध्ये राबविण्यात आले. या कार्यक्रमाचा हेतू मुलांच्या अंगी स्वच्छतेची सवय लागावी व महात्मा गांधीजी सारख्या थोर पुरुषांचे विचार मुलांच्या मनात बिंबवले जावे हा होता.

या कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली व त्यानंतर सर्व मुलांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळेतील व शाळे भोवतालच्या परिसराची स्वच्छता केली. या कार्यक्रमांमध्ये पाचवी ते आठवीच्या मुलांनी गांधीजी विषयी त्यांचे विचार मांडले. तसेच सहावी ते आठवीच्या मुलींनी गांधीजींच्या विचारांना उजाळा देणाऱ्या कलाकृत्या सादर केल्या. तसेच इयत्ता चौथी मधील विद्यार्थी आर्यन काळेल याने केलेली गांधीची वेशभूषा लक्षवेधी ठरली. शाळेचे मुख्याध्यापक  दादासाहेब खराडे यांनी मुलांना गांधीजींचे विचार सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी

संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना हरिदास डांगे हे उपस्थित होते. त्यांनी मुलांना आपल्या परिसरातील स्वच्छता कशी राखावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली व सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.  तसेच संस्थेच्या खजिनदा आशाताई बिले, संचालिका स्वाती बिले, प्रतिष्ठित नागरिक भीमराव घाडगे, झरे सरपंच भारत मोरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नफिसा घोडके व आभार सतीश कोंडलकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *