एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) दिनानिमित्त व महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त घारगाव येथे अंगणवाडी शाळेत खाऊ वाटप
करमाळा प्रतिनिधी
आयसीडीएस कार्यक्रम २ ऑक्टोबर १९७५ पासून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंती दिनी सुरू करण्यात आलेला आहे. हा
कार्यक्रम केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. बालकांची काळजी शारीरिक व मानसिक विकास तसेच आरोग्य व पोषण यासंबंधी च्या गरजा एकमेकाला पूरक आहेत.
घारगाव येथील अंगणवाडी शाळेत आज एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस ) दिनानिमित्त व महात्मा गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अंगणवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घारगावच्या सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांचे कडून खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच लक्ष्मी सरवदे, उपसरपंच सतीश (बापू) पवार, माजी सरपंच लोचना (काकू) पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, समाधान सरवदे अंगणवाडी सेविका तांबोळी मॅडम, शिंगटे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.