लऊळ प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र तुळजापूर ते शिखर शिंगणापूर या देवस्थान ला जोडणाऱ्या तीर्थक्षेत्र जोड महामार्गांचे काम मंजूर झाले आहे. सदरचा महामार्ग हा तुळजापूर-वैराग-माढा-चिंचोली-भुताष्टे-पडसाळी-भेंड- व्होळे-वरवडे-परिते बेंबळे, वाफेगाव-अकलूज-नातेपुते-शिखर शिंगणापूर या मार्गे होणे गरजेचे आहे. हा मार्ग खूप जुना असून हा मार्ग जनतेच्या उपयोगाचा आहे.
जुन्या काळी याच मार्गावरून बेंबळे ते माढा अशी बस सेवा सुरु होती. बेंबळे भागातील शेतक-यांना माढा येथे जाण्यासाठी हा मार्ग योग्य व जवळ आहे. तसेच मंजूर झालेल्या महामार्गाचे काम या मार्गे झाल्यास अंतर ही २५ ते ३० किमी वाचणार आहे तेव्हा सदर महामार्ग याच मार्गे होणे गरजेचे आहे. यासाठी माढा, शिंदेवाडी, चिंचोली, भुताष्टे, पडसाळी येथील ग्रामस्थांनी
ग्रामपंचायतीचा ठराव व निवेदन माढयाचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांना रविवारी रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस ला माढा रेल्वे स्टेशनला येथे थांबा मिळणार आहे. तेथील उद्घाटनाच्या प्रसंगी असे सर्वानुमते ठरविण्यात आले तसा ठराव मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
निवेदन देते समय सरचिटणीस भाजपा माढा तालुका तथा सरपंच ग्रामपंचायत पडसाळी योगेश पाटील, महेश पाटील, महादेव पाटील, सिध्देश्वर देशमुख, अजिंक्य पाटील, अजय पाटील
भुताष्टे गावचे सामाजिक कार्यकर्ते सागर यादव, माऊली नाना पाटील (मेजर) चिंचोली गावचे सरपंच संतोष भिमराव लोंढे,संदीप लोंढे,दिलीप लोंढे,बाळासाहेब लोंढे, चेअरमन सुहास बागल, प्रवीण टोंगळे साहेब यादी पंचक्रोशीतील ग्रामस्थ पदाधिकारी नेते उपस्थित होते
चौकट
तुळजापूर शिखर शिंगणापूर रस्ता माढा भुताष्टे पडसाळी व्होळे बेंबळे मार्गे जाण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातुन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली तरी चालेल पण तीर्थक्षेत्र जोड रस्ता करणारच यासाठी कोणताही संघर्ष करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. लवकरच शिष्टमंडळ खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत.
योगेश सुरेश पाटील
तुळजापूर शिखर शिंगणापूर रस्ता संघर्ष समिती