करमाळा प्रतिनिधी

पावसाळा संपत आला तरी करमाळा तालुक्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये पर्जन्यमान अत्यल्प आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये चारा टंचाई व पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते त्या अनुषंगाने सर्व विभागांची आढावा बैठक करमाळा तालुक्याचे

लोकप्रतिनिधी आ. संजयमामा शिंदे यांचे अध्यक्षतेखाली उद्या सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय करमाळा येथे आयोजित केली असल्याची माहिती प्र. तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी दिली.

सदर आढावा बैठकीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, लघु पाटबंधारे मोडनिंब /करमाळा, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा पंचायत समिती करमाळा, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था

करमाळा, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उपअभियंता जलसंधारण, उपअभियंता जलसंपदा, पशुसंवर्धन अधिकारी, उपअभियंता पाटबंधारे उपविभाग, अभियंता पाटबंधारे

विभाग, कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12, भीमा सिंचन उपसा उपविभाग क्रमांक 1 व कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 7 आदी अधिकारी मंडळींना निमंत्रित केले असून संभाव्य चारा टंचाई व पाणी टंचाईच्या अनुषंगाने यामध्ये चर्चा होणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *