चिपळूण घटने संदर्भात कुर्डूवाडी येथे नाभिक असोशियन संघातर्फे निवेदन
कुर्डुवाडी प्रतिनिधी
कुर्डूवाडी येथे नाभिक असोशियन संघातर्फे उपविभागीय अधिकारी भटुकडे व सहाय्यक अधिकारी रवींद्र कदम यांना चिपळूण येथील नाभिक समाजाच्या कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण राहणार खेड तालुका चिपळूण येथे काही अज्ञात व्यक्तींनी
अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचा सरकारने गृह विभागामार्फत तपास करून दोशीस कठोरात कठोर शासन व्हावे व लवकरात लवकर सजा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कुर्डूवाडी नाभिक असोसिएशन संघाचे अध्यक्ष दयानंद जाधव, नाभिक महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास गाडेकर, भाजपा माढा विधानसभा विस्तारक
अनंत राऊत, ज्येष्ठ नेते भगवान दळवी, वसंतराव चौधरी, अमोल गाडेकर, कुमार दळवी, नानासाहेब कोकाटे, तेजस गाडेकर, संतोष गाडेकर, ओंकार गाडेकर, चेतन गाडेकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. निवेदन देण्यासाठी
कुर्डूवाडी नाभिक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.