करमाळा पुणे रोडवरील अपघाताचा धोका टाळण्यासाठी तात्काळ गतिरोधक तयार करावेत – प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख, करमाळा.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा – कोर्टी रस्त्याचे काम चालू असून सदर रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आल्याने रस्ता मोठा झालेला आहे. करमाळा कोर्टी रोडवरून वाहतूक मोठया प्रमाणात वाढलेली असल्याने सदर रस्त्यावरून वाहने सुसाट वेगाने वाहत आहेत. या ठिकाणी
मोठया प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून करमाळा पुणे रोडवरील नवभारत इंग्लिश स्कूल, गिरधरदास देवी विद्यालय, नोबल इंग्लिश स्कूल या ठिकाणी गतिरोधक तयार करणेबाबतचे निवेदन करमाळा शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना समक्ष भेटून दिले आहे. तसेच सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक
बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी, तहसिलदार करमाळा यांना ई मेल द्वारे पाठविलेल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना गायकवाड यांनी सांगितले की, सदरच्या रोडवर लहान मुलांच्या तीन शाळा व मोठया मुलांची प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय अशा शाळा आहेत. सदरच्या शाळेतून हजारो विदयार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा
सुटल्यानंतर काही विदयार्थी पायी तर काही विद्यार्थी सायकल वरून घरी जात असतात. परंतु शाळेशेजारी कोणतेही गतिरोधक नसल्याने येणाऱ्या वाहनांचा विदयार्थ्यांना व वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होवून मोठी जिवीत हानी होवू शकते. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ नवभारत इंग्लिश स्कूल या ठिकाणी 4 गतिरोधक व नोबल इंग्लिश स्कूल या ठिकाणी 4 गतिरोधक बसविणेची व रस्त्याच्या दुतर्फा “पुढे शाळा आहे वाहने सावकश चालवा” अशा आशयाचे सुचना फलक लावणेत यावेत असे निवेदन दिले आहे. तसेच सदर ठिकाणी कोणताही अपघात घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर राहणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.