जातेगाव येथील विद्यार्थी अबॅकस परीक्षेमध्ये उत्तुंग यश सुवर्णपदकाचे मानकरी
करमाळा प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी जातेगाव प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी करमाळा मुथा अबॅकस अकॅडमी मध्ये अबॅकस च्या दोन-तीन लेव्हल्स यशस्वीरित्या शंभर पैकी शंभर मार्क घेऊन पूर्ण केल्या व त्यांची निवड डिसेंबर मध्ये
होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी झाली आहे. फक्त एक ते दीड या महिन्याच्या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र झालेल्या बदल पालकांना दिसत आहे. अक्षरशः हे विद्यार्थी कॅल्क्युलेटर पेक्षाही जलद गतीने गणितीय क्रिया करत आहे व
कोणताही पाढा त्यांना पाठांतर न करता सहजरीत्या ते सांगू शकतात. या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण जातेगाव प्राथमिक शाळेमध्ये संपन्न झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर, सय्यद सर, आतार सर, शेख सर, जगताप मॅडम, शिंदे
मॅडम, मुलाणी मॅडम, कुलकर्णी मॅडम, वाघावकर मॅडम सर्वांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाचे वितरण करण्यात आले. तसेच या शाळेमधील एटीएस या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुथा अबॅकस अकॅडमी तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यशाचे मानकरी सत्यम धनंजय कामटे, विश्वजीत गणेश कामटे, सृष्टी गणेश कामटे, विराज नानासाहेब कामटे या विद्यार्थ्यांना मुथा अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. शाळेमधील शिक्षकांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.