मकाईच्या निवडणूकीच्या अनुषंगाने झोळ परिवारातच आरोप प्रत्यारोप
करमाळा-प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यापासुन प्रा. रामदास झोळ यांनी नेहमीच बागल गटावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपुर्वी बाळासाहेब पांढरे यांनी सुध्दा प्रा. झोळ यांच्यावर टिका केली होती. तर आता गणेश झोळ यांनी प्रा. रामदास झोळ यांच्यावर टिका केली आहे. त्यांनी अशी टिका केली आहे कि, प्रा. झोळ हे गोविंदपर्व कारखान्याच्या उभारणीपासुन बोर्डात असताना, शेतकऱ्यांची देणी, डिसीसी बँकेचे कोट्यवधी रु. थकित ठेवून प्रा. रामदास झोळ यांनी पळ काढला. असल्याची टिका गणेश झोळ यांनी केली आहे.
आता या टिकेवर प्रा. रामदास झोळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे कि, गोविंदपर्व कारखान्याचा आणि माझा कसला ही संबंध नाही. त्या कारखान्याचा मी भागधारक अथवा संचालक बॉडीवर देखील नव्हतो. मी कोणावर हि टिका करत असताना माझ्याकडे तशाप्रकारचे पुरावे असतील, तरच मी समोरील व्यक्तीवर टिका करतो. जर गणेश झोळ यांच्याकडे गोविंदपर्व आणि माझा काही संबंध असल्याबाबतचे पुरावे असतील. तर त्यांनी तसे पुरावे सादर करावेत, अन्यथा मी गणेश झोळ यांच्यावर माझी नाहक बदनामी करत असल्याबाबत, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
आता जे वाशिंबे ग्रामपंचायतीविषयी माझ्यावर टिका करत आहेत. तर तेच गणेश झोळ माझ्या पॕनेलकडून त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी आमच्याकडे सतत ये-जा करत होते. त्यामुळे जो व्यक्ती आमच्या पॕनेलची उमेदवारी मिळावी म्हणुन सतत पळापळी करत होता. अशा व्यक्तिविषयी बोलणे सुध्दा मी योग्य समजत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे.
गवत पातळीवर आलेले अपयश आणि गोविंद पर्व मध्ये शेतकऱ्यांची थकलेली बिलाकडे दुर्लक्ष करण्यासाठी मकाईचा वापर केला जात आहे. प्रा. झोळ यांचे गावातून डिपॉझिट जप्त झालेले असताना त्यांनी मोठ्या गप्पा मारू नये. स्वतःचे आमदारकीचे डोहाळे पुरवण्यासाठी मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा वापर करणे चुकीचे असून मकाईच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा सुधरवण्याची चालवलेला उठारेठा थांबवून गोविंद पर्वच्या बिलाबद्दल बोलावे असे आव्हान बागल गटाचे पश्चिम भागाचे नेते गणेश झोळ यांनी व्यक्त केले आहे.
झोळ यांनी बोलताना सांगितले, आदिनाथ बिनविरोध करण्याची भाषा करणाऱ्यांनी जनाधार नसलेल्या लोकांना बरोबर घेऊन मकाईची निवडणूक लावण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक जिंकणार नाही माहीत असतानाही फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मकाईची निवडणूक लावून बागल गटावर टीका करणे व चर्चेत राहणे हा यामागील यामागील एकमेव उद्देश आहे. प्रा. झोळ यांना मकाईची निवडणूक लागतात अचानक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मकाई बद्दल पूतनामावशीचे प्रेम निर्माण झाले आहे. तत्पूर्वी गोविंदपर्व कारखान्यातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार यांची उसबील, कामगारांचे वेतन, वाहतूकदारांची देणी याबद्दल प्रा. झोळ यांनी आधी बोलायला हवे. ते स्वत:ला शेतकऱ्यांचे काळजीवाहू
समजत असतील तर उभारणी काळापासून गोविंदपर्वच्या बोर्डात असताना देणी आणि सोलापूर डि.सी.सी. चे कोट्यावधी रुपये थकवून संस्थेपासून पळ काढण्याऐवजी बागलांप्रमाणे प्रायव्हेट प्रॉपर्टी गावात ठेवून ही देणे देण्याचे कर्तव्य का पार पाडले नाही? त्यांना वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीत अनामत रक्कम हे रक्ता आली नाही त्यांनी मकाई कारखान्यात बद्दल बोलूच नये.
निव्वळ आमदारकीचे डोहाळे लागलेत म्हणून सभासदांची दिशाभूल करू. आगामी काळात दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली मकाई सहकारी कारखान्याची यशस्वी वाटचाल होणार आहे असे गणेश झोळ यांनी बोलताना सांगितले.