
भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकित संचेती यांची जितेश कटारिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि जैन युवा कॉन्फरन्स चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकितजी संचेती करमाळा शहराच्या दौऱ्यावर असताना आई कमलाभवानी मंदिरात भोगी करून भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भाजपा व्यापार आघाडी आणि कटारिया परिवार तर्फे त्यांचा सत्कार

करण्यात आला. या भेटीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून दिल्याबद्दल केतुर येथील सोनबा कोकणे यांचा सत्कार अंकितजी संचेती यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमचे बंधू ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन चे जिल्हा अध्यक्ष रितेश कटारिया, भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य दिपक चव्हाण, तालुका सरचिटणीस शाम सिंधी, ज्येष्ठ नेते प्रदिप देवी, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते जयंत दळवी, उद्योजक नैनिष कटारिया उपस्थित होते.
