मुंबई विजापूर पॅसेंजर सुरू करण्याची खासदार निंबाळकर यांच्या कडे भाजपा महिला आघाडीची मागणी

जेआरडी माझा

आज माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा तालुक्याच्या दौऱ्या वर आले असता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या वतीने बंद असलेली मुंबई विजापूर पॅसेंजर सुरू करण्याची मागणी मागणी खासदार यांच्याकडे महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा गोफ़ने यांच्या लेटर पॅड वर करण्यात आली. या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लवकरात

लवकर गाडी सुरू करण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न करु व ही गाडी लवकर सुरु करण्यात येईल हे आश्वासन दिले.

या वेळी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष धनश्री खटके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश पाटील, सरचिटणीस सुधीर गाडेकर, महिला शहर सरचिटणीस स्वाती ताई गोरे, विद्या गोसावी, पद्मावती दातार, वासंती गवळी, बालाजी गायकवाड, सागर तरंगे, आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *