आदिनाथचे चेअरमन डोंगरे यांचे अभिनंदन- दशरथ कांबळे
करमाळा प्रतिनिधी
एका कारखाना संचालक नातेवाईकाकडे किती येणे बाकी आहे ते जाहीर केल्याबद्दल चेअरमन धनंजय डोंगरे यांचे अभिनंदन करा अशी माहिती आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ कांबळे यांनी सांगितले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची काही रक्कम संचालकाच्या नातेवाईकांनी किती घेतली आहे याबाबत काल प्रसिध्दी माध्यमांना डोंगरे यांनी स्पष्ट आकडेवारी सहीत प्रसिद्ध केली आहे त्याच प्रमाणे आजून साडे बारा कोटी रूपयांच्या आसपास रक्कम आजी माजी नेते मंडळी, संचालक मंडळी यांच्या नातेवाईक यांना दिली आहे ती रक्कम डोंगरे यांनी
आकडेवारी सहीत प्रसिद्ध करावी त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यांना समजेल कि आपला पैसा कुठे गेला तो, ते केल्यानंतर डोंगरे यांच्या वर शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बसेल त्यांनी अडचणीत असलेला कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केला असे सांगितले आहे. तसेच साडे बारा कोटी रूपये कारखान्याचे कुठे गेले ते सांगावे. असेही मला मिळालेल्या माहितीनुसार काही संचालक व नेते मंडळी यांच्या नातेवाईक यांनी वाहन मालक म्हणून मोटार सायकल, रिक्षा अश्यांचे नंबर देऊन लाखो रुपये उचलले आहेत यामुळे त्यांच्या नावासहीत माहिती मिळावी असे दशरथ कांबळे यांनी सांगितले आहे.
…..
जगदाळे यांना ऊसावर अँडवान्स दिला आहे. पुर्वी काही वाहन मालकांनी उचल घेतली आहे त्यातील काही रक्कम काही जणांनी भरली आहे. ज्यांनी नाही भरली त्यांच्या वर केसेस कारखान्याच्या मार्फत दाखल केले आहे जर कोणी मोटार सायकल अथवा रिक्षाचे नंबर देऊन पैसे उचलले असेल ते त्यांनी निदर्शनास आणून दिले तर याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू – चेअरमन धनंजय डोंगरे, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा