नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचे दुख:द निधन

करमाळा प्रतीनिधी

करमाळा तालुक्याचे सुपूत्र झरे गावचे रहिवासी नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बापुराव बागल यांचे  ३९ व्या वर्षी ग्वालियर झांसी येथे दुखःद निधन झाले आहे. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत समजताच झरे गावावर दु:खाची छाया पसरली आहे. त्यांचे अंतिम संस्कार उद्या शुक्रवारी झरे येथे शासकीय इतमामात  होणार आहे.

      नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल हे २००३ साली भारतीय सेनेत भरती झाले होते. ते ग्वालियर ८ या ठिकाणी सेवेत असताना त्यांचे दुख:द झाले.

नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचा जन्म १९८४ साली झाला असुन त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण झरे गावात झाले असुन महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले त्यानंतर २००३ साली ते भारतीय सेनेत भरती झाले त्यांना पुढे पदोन्नती मिळून ते नाईक सुभेदार झाले. गायन सम्राट बापुराव बागल यांचे ते चिंरजिव होते. त्यांच्या पश्चात आईं, वडील, पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *