भा.ज.पा. ने षडयंत्र रचुनच राहुल गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न – अध्यक्ष जगताप
करमाळा – अखिल भारतीय काँग्रेस आय पक्षाचे सर्वेसर्वा राहुलजी गांधी यांच्यावर सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. भा.ज.पा. सरकारने षडयंत्र रचुनच राहुलजी गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना जगताप म्हणाले कि, वास्तविक पाहता राहुलजी गांधी यांची वाढती लोकप्रियता पहाता भा.ज.पा. सरकारच्या पायाखालची वाळु सरकली आहे आणि म्हणुनच अशी कट कारस्थाने रचण्याचा डाव
भा.ज.पा. अनेक वर्षापासुन करत आहे. यातुन लोकशाही संपवण्याचा हेतु हा भा.ज.पा. सरकारचा आहे हे स्पष्ट होते. भारत जोडो यात्रेमुळे भा.ज.पा. विरोधी देशातील सर्व छोटे-मोठे पक्ष एकत्रित येत असुन देशातील सामान्य जनता हि भक्कमपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी रहात आहे. राहुलजी गांधी यांना नक्कीच न्यायदेवतेकडुन न्याय मिळेल असा ठाम विश्वासही जगताप यांनी शेवटी व्यक्त केला. भा.ज.पा. सरकारच्या निषेधाचे पत्र आज नायब तहसिलदार जाधव यांना देण्यात आले.
यावेळी ओ.बी.सी. विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे व आनंद झोळ, बबलु चिंचकर, योगेश राखुंडे, निखिल शिंदे, गितेश लोकरे, गणेश फलफले, नितीन चोपडे, बालाजी पवार, विकी महानवर आदी पदिधिकारी उपस्थित होते.