वेतनातील त्रुटी दूर व्हावेत यासाठी करमाळा तालुक्यातील 75 शिक्षकांचे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांना सामूहिक पत्र
2004 नंतर लागलेल्या व 2016 पासून चटोपाध्याय मिळालेल्या बांधवांच्या वेतनातील त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी करमाळा तालुक्यातील 75 शिक्षक बंधू-भगिनी यांनी दि. 23/03/2023 रोजी प्रधान सचिव, महारष्ट्र राज्य यांना सामूहिक पत्र व्यवहार करून आपली व्यथा मांडली. त्यासाठी करमाळा पोस्ट ऑफिस, जिंति पोस्ट ऑफिस, जेऊर पोस्ट ऑफिस मधून अशी पत्र टाकण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की, सेवेतील बारा वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर शिक्षकांना डॉक्टर
चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होत असते त्या मधूनच 2016 नंतर ज्या बांधवांना डॉ. चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू झालेली आहे, त्या बांधवांच्या वेतनामध्ये बेसिक मध्ये फक्त 700 रुपयाचा फरक पडत आहे परंतु तत्पूर्वी सहाव्या वेतन आयोगामध्ये बेसिक मध्ये 1400 रुपयांचा फरक पडत होता आणि त्याला 142 टक्के महागाई पकडली तर साधारण 3400 ते 3600 रुपये वेतन वाढ होत होते परंतु 2016 पासून पुढे चटोपाध्याय मिळालेला आहे अशा बांधवांना 700 रुपयाचा वाढ फक्त बेसिक मध्ये होत आहे आणि त्याला महागाई पकडून फक्त 1000-1100 रुपयाची वाढ मिळत आहे हे अत्यंत खेददायक आणि
चुकीची बाब आहे. या बाबत महाराष्ट्रातुन खूप बांधव कोर्टात गेलेले होते, कोर्टाने सुद्धा वेतन तफावत दूर करावी असे महाराष्ट्र शासनाला सांगितले आहे, परंतु अजून वेतन त्रुटी दूर केलेल्या नाहीत, म्हणून त्यांना तात्काळ निर्णय घ्यावा या साठी करमाळा तालुक्यातील दत्तात्रय जाधव, अशोक दुधे, अशोक बरडे, लक्ष्मण भंडारे, अच्युत कोल्हे, तात्यासाहेब जाधव, अरुण चौगुले, प्रिया वीर, सुजाता अनारसे, हेंद्रे मॅडम, चंद्रकांत रोडे, मारुती ढेरे, हौसराव काळे, राजेंद्र दनाने, तुळशीराम जगदाळे, ठकसेन लवटे, सुनील नरसाळे, पोपट पाटील, विनोद वारे, श्रीराम बुलबुले, उमेश माहुले, संतोष जगताप, नीलकंठ शेळके, त्या बरोबर तालुक्यातील इतर पोस्ट ऑफिस मधून ही अशी 75 शिक्षकांनी पत्र पाठवली उद्या अजून राहिलेले बांधव पत्र पाठवणार आहेत. अशी माहिती अरुण चौगुले यांनी दिली.