ऊस उत्पादक शेतकरी राजा साठी पाडव्याला मकाई व आदिनाथने साखरेचे वाटप चालू करावे- सोमनाथ जाधव
तालुक्यातील सहकारी तत्त्वावरील चालणारे दोन कारखाने आहेत त्यामध्ये मकाई व श्री आदिनाथ ही दोन्ही कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत त्यामुळे पाडव्यासाठी साखरेचे वाटप चालू करावे अशी मागणी प्रहार चे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी केली आहे. गुढीपाडवा हा शेतकरी राजाचा आनंदाचा सण असून साडेतीन मुहूर्ता पैकी एक असून या सणाला साखर वाटप होणे गरजेचे आहे. ही साखर ऊस उत्पादकासाठी प्रति 5 रु. किलो दराने व सभासदांसाठी प्रति 2 रु. किलो दराने वाटप केले जावे अशी मागणी जाधव यांनी केली आहे.