संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये भजन गायन, आरती वारकऱ्यांनी अन्नदान

जेआरडी माझा

श्री राजयोगी त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याने करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये भजन, गायन, आरती करून वारकऱ्यांनी अन्नदानाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. गेली 21 वर्षापासून ये दिंडी देवळाली प्रवरा ते पंढरपूर जात आहे. करमाळा येथील संयोजन व्यापारी प्रदीप देवी हे दरवर्षी करतात. वर्षाची सांगता व नववर्षाचे स्वागत या उद्देशाने दिंडी निघते व पंढरपूर येथे पोहोचते यावर्षी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याचे दिंडी चालकांनी जाहीर केले त्यांच्या वतीने प्रदीप देवी यांना भगवान श्रीकृष्ण यांच्या संपुर्ण  जीवनावर अधारित ‘हरिविजय ग्रंथ’  देऊन त्यांचा सत्कार केला.

 दिंडी चालक सीताराम भाऊ धुस, ह भ. प. बाबा महाराज शास्त्री, ह. भ. प. नामदेव महाराज,  ह.भ.प.सुभाष महाराज यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी गुरु गणेश गोपालन संस्थेचे अध्यक्ष  श्रेणिकशेठ खाटेर,  नितीन दोशी, किरणा असोचे. रितेश कटारिया, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे,  मोहन सुरवसे, आम आदमी पार्टीचे तालुका संघटक दत्ता काटकर, अप्पां झाकणे, शंकर रासकर, संजय गांधी, निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, सतीश शिगाडे, अमोल परदेशी,  प्रवीण देवी, रवींद्र विदवत, कुरुलकर मॅडम, दत्तपेठ तरुण मंडळ,नितीशभैय्या देवी, हर्ष घोडेगावकर, यश बालदोटा , ओम शिंगाडे व मित्र परिवार उपस्थित होता..

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *