डॉ. आप्पा माने यांना राज्यस्तरीय मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्कार प्रदान…
प्रतिनिधी
शेलगाव क, ता. करमाळा येथील रहिवासी असलेले व सध्या मिरजगाव ता. जामखेड, जि. अ. नगर येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयातील माजी प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आप्पा माने यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्कार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदान करण्यात

आला .टाकळीभान येथे आयोजित पहिल्या मराठी ग्रामीण राज्यस्तरीय संमेलनामध्ये हा पुरस्कार त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब सौदागर, सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, आमदार लहू कानडे, समीक्षक डॉ. रवींद्र ठाकूर, कवयित्री संजीवनी तडेगावकर, प्रा.डॉ. शिरीष लांडगे, प्रा. डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. आप्पा माने हे शेलगाव क तालुका करमाळा या गावचे सुपुत्र असून सन 2008 पासून ते मिरजगाव येथील महात्मा फुले नूतन महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मार्गदर्शक म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत .सन 2018 ते 2022 या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडलेली आहे.

डॉ. आप्पा माने यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आ. संजयमामा शिंदे, शेलगाव क चे सरपंच अशोक काटूळे ,उपसरपंच प्रतिनिधी सचिन वीर, प्राचार्य जयप्रकाश बिले, प्राचार्य डॉ.महेंद्र कदम, प्रा.डॉ. इंद्रजीत वीर, प्रा.डॉ. युवराज पाटील, प्रा.डॉ. नागनाथ माने, प्रा.डॉ.दत्तात्रय कातूरे, डॉ. विकास वीर, प्रकाश ढावरे सर, चंद्रहास शिंदे गुरुजी,माजी उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *