यात पहा ग्राहकांनी आपले हक्क समजून घेणे गरजेचे – माधुरी परदेशी
करमाळा प्रतिनिधी
” प्रत्येकानी आपण ग्राहक आहोत याची जाणीव ठेवत आपली फसवणूक टाळण्यासाठी आपले हक्क समजून घेऊन जागरूक रहावे”, असे आवाहन अर्बन बॅकेच्या माजी संचालिका तथा ग्राहक पंचायतीच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माधुरी परदेशी यांनी केले. त्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत क्रांती शहर स्तर अंतर्गत महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नगरपालिकेचे तुषार टंकसाळे, श्री शिंदे,
रेखा परदेशी, वंदना उबाळे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


पुढे बोलताना माधुरी परदेशी म्हणाल्या की,
ग्राहक पंचायत काय आहे? ग्राहक म्हणून आपली कुठे फसवणूक होते का? त्यावर काय पर्याय- उपाय आहेत ?ग्राहक सरक्षण कायदा काय आहे? आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाकडून मिळणाऱ्या सेवा सुविधा बद्दल सतर्क ता, वीज समस्या ,बँकेत येणाऱ्या अडचणी, रेशनिंग याची माहिती देऊन जागृत होण्यासाठी ग्राहक पंचयातीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी फसवणूक झालेले व त्यांना मिळालेला न्याय – निकाल याचेही काही उदाहरणे देऊन जागृती करण्यात आली.


यवेळी रेखा परदेशी ने रेशनकार्ड चे ॲपवर आपला रेशनिंग नंबर टाकून आपल्या रेशनिंग दुकानात आपले धान्य आले की नाही हे पाहता येते हे समजून सांगितले.
वंदना उबाळे यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायत काय आहे हे समजण्यासाठी त्यांनी एक उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिले. ग्राहक पंचात च्या माध्यमातून समस्या सुटली जाते अस सांगून काही अडचणी असेल तर ग्राहक पंचायत कडे दाद मागू शकता असे आवाहन वंदना उबाळे यांनी केले. रेखा परदेशीनी उपस्थित महिलेचे आभार मानले.यावेळी सर्व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *