मुथा अबॅकस अकॅडमीने राष्ट्रीय स्तरावर यशाची परंपरा कायम ठेवून करमाळ्याचा झेंडा फडकवला

करमाळा प्रतिनिधी

आठ जानेवारी रोजी झालेल्या अरिस्टो किड्स अंतर्गत अबॅकस व वैदिक मॅथ राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा 2 फेब्रुवारी रोजी यश कल्याणी सेवाभावी सदन येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय गणेशजी करे पाटील मार्गदर्शक मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर,प्रमुख पाहुणे स्नेहालय स्कूलच्या संस्थापिका धनश्री दळवी मॅडम, संस्थापक नितीन भोगे सर  प्रा.उत्तम विटूकडे सर प्रा. पवार सर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित व प्रचंड पालकांच्या उपस्थित उत्साहात पार पडला

याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले गणेशजी करे पाटील सरांनी अबॅकस हा विषय विदेशात प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी विषय म्हणून शिकवला जातो जर आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी वाटचाल करावयाची असेल व उज्वल भविष्य बनवायचे असेल तर अबॅकस व वैदिक मॅथ अत्यंत महत्त्वाचा विषय आहे यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते व त्याची गती वाढते मुथा abacus अकॅडमीच्या संचालिका  ज्योती मुथा यांनी करमाळ्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळवून दिले या कार्यक्रमाच्याप्रसंगी प्राध्यापक उत्तम विटुकडे सर व प्राध्यापिका सारिका विटूकडे यांचे स्वलिखित दहावीच्या समाजशास्त्र या विषयाच्या नोट्स (गाईडचे )विमोचन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

मुथा अबॅकस अकॅडमी तर्फे करमाळा येथील वाहन चालकांचा मानपत्र देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला श्री सुहास रोडगे ,श्री शिवाजी काळे ,श्री गोरख इरकर

या कार्यक्रमाच्या प्रसंगी सौ.प्रिया शिंदे व सुनील जाधव सर या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांमध्ये

यश शहा  अथर्व कुलकर्णी, रिया शहा ,  दिव्यांका बागल,गौरी राणे ,सानिका पंडित ,हर्षल वाघमोडे ,श्रेया खळतकर  या बालचिमुकल्यांनी आपले क्लास बद्दल व मॅडम बद्दल मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला प्रचंड पालकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मुथा यांनी केले व आभार प्रदर्शन पल्लवी भिंगारे यांनी केले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *