बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र करमाळ्याच्या शेतकऱ्यांचे पैसे का थकवले?जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेले शेतकऱ्यांचे पंचनामे झाली असून जवळपास 49 कोटी रक्कम शासनाने शेतकऱ्यांना अदा करायचे आहे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली मात्र करमाळा तालुक्यातील शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई पासून वंचित आहे ही बाब बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या

आज ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी भेट घेऊन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याची बाब लक्षात आणून दिली

करमाळा तालुक्यातील आठ मंडळातील 30 टक्के पेक्षा पिकाची जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते

नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या वृष्टीत केळी कांदा तूर भाजीपाला आधी पिकांची नुकसान झाली होती याची पंचनामे करमाळा तहसील कार्यालय मार्फत करण्यात आली होती
जिरायती
पिकांना हेक्टरी सतरा हजार रुपये तर बागायती पिकांना 27 हजार रुपये प्रति हेक्टरीस
फळबागांसाठी प्रतिकृती नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे
जवळपास 48 ते 49 कोटी रुपये ची नुकसान भरपाई करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे पण निधी उपलब्ध नसल्यामुळे नुकसान भरपाई अद्याप मिळाली नव्हती मात्र सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नुकसान भरपाई देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले करमाळा तालुक्यातील
शेतकऱ्यावर अन्याय असून दखल घ्यावी अशी विनंती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महेश चिवटे म्हणाले जाणीवपूर्वक करमाळा तालुक्यावर अन्याय केला जात आहे बार्शी तालुक्याला मदत मिळते व करमाळ्याचे पैसे का जात नाहीत
……
प्राध्यापक शिवाजीराव सावंत
__
नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या करमळते करमाळ्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना गळ घातली असून शिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कानावर ही बाब घातली आहे
बार्शी चा निधी वितरित केला
जातो करमाळ्याचा थांबवला जातो ही बाब गंभीर असून शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे
……
महेश चिवटे

नुकसान भरपाई साठी आलेला निधी समप्रमाणात प्रत्येक तालुक्याला देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक प्रशासकीय अधिकारी एकाच तालुक्याला निधी वाटप करतात हे चुकीचे आहे करमाळ्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्यामुळे हा प्रश्न आठ दिवसात निकाली लागेल

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *