
आदिनाथ बाबत ऊस वाहतूकदार शेतकरी समाधानी
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे चालू आहे अशी माहिती चेअरमन धनंजय डोंगरे व व्हा चेअरमन रमेश कांबळे यांनी दिली आहे.
उत्तम प्रकारे गाळप चालू आहे. केडगाव येथील ऊस वाहतूकदार शेतकरी बोराडे यांनी 41 टन ऊस वाहतूक करून आणली आहे. वजनावरून लक्षात येते की, कारखान्याचा काटा बरोबर आहे. आदिनाथ कारखाना आत्ता पण काटा मारत नव्हता आणि भविष्यातही मारणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी आदिनाथ कारखान्यालाच ऊस घालावा कारण आम्ही काटा पेमेंट देत आहे आता पर्यंत ज्या शेतकऱ्यांना दिले आहे ते शेतकरी समाधानी आहेत यावेळी कार्यकारी संचालक अरूण बागनवर,संचालक नानासाहेब लोकरे, संचालक नितीन जगदाळे, संचालक हरिदास व्यवहारे, संचालक पांडुरंग जाधव, संचालक नामदेव भोगे, संचालक गोडगे, आदि संचालक उपस्थित होते.


