जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर शाळेचे घवघवीत यश जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून समाज कल्याण विभाग जि. प. सोलापूर यांच्या वतीने दिव्यांग बालकांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री जगदंब कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयाने घवघवीत यश संपादनन केले आहे. वयोगट 8 ते 12 वयोगटात मध्ये 50 मीटर धावणे निहाल शेख प्रथम क्रमांक, वयोगट 12 ते 16 मध्ये कु. श्रेया जगताप गोळा
फेक मध्ये प्रथम क्रमांक व कुमारी आरती चेडे हिने 16 ते 18 वयोगटात लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला. कुमारी अनुजा तोरडमल हिने 8 ते 12 वयोगटात लांब उडीत द्वितीय क्रमांक पटकावला, तोहित शेख याने 12 ते 16 वयोगटात लांबउडीत द्वितीय क्रमांक व तोहित शेख याने 12 ते 16 वयोगटात लांबउडीत द्वितीय क्रमांक व वयोगट 16 ते 18 मध्ये कुमारी
आरती चेडे हिने गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कु. सुषमा मरळ हिने 16 ते 18 वयोगटात 200 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय व 400 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. सांस्कृतिक स्पर्धेत ” हळद लागली मल्हारी पिवळा ” झाला या गीतावर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री ज्ञानदेव गुरमे व श्री तानाजी कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम
घेतले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. श्री. चित्रसेन पाथरूट सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री नागनाथ पाथरूट सर व शाळेच्या मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.