जामखेड प्रतिनिधी

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार हे व्यवस्थापकीय संचालक पदास पात्र नसतांनाही त्या पदावर राहुन किमान दिड कोटीचा घोटाळा केल्याबाबत. केलेल्या अर्जावर कोणत्याही प्रकारे प्रशासनाने कारवाई केली नसल्याने गणेश भानवसे हे आझाद मैदान मुंबई येथे शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रताप पवार हे सध्या जिल्हा व्यवस्थापक असून त्यांच्याकडे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. परंतु शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. संर्कीय-२०२५/प्र.क्र.१०/महामंडळे दि. ०७ जुलै २०२५ नुसार ते या पदास पात्र ठरत नाहीत. कारण सदरील पदास व्यवस्थापकीय संचालक हा शासनाच्या सह / उप सचिव या दर्जाचा असावा असे स्पष्ट नमुद केलेले आहे.

प्रताप पवार यांची नियुक्ती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ५६ व्या सभेतील विषय क्र. ११ नुसार लिपीक या पदावर झाली होती. त्यांना वारंवार अनियमित पदोन्नती देण्यात आल्या आहेत. प्रताप पवार यांना २०१६ या वर्षी जिल्हा व्यवस्थापक या पदावर पदोन्नती देण्यात आली होती ही पदोन्नती संचालक मंडळाच्या दि. ०३/१०/२०१७ रोजीच्या ११४ व्या सभेतील ठराव क्र. ११४:०३ नुसार पदावनत (रद्द) करण्यात आले होते. सदरील ठरावाची अंमलबजावणी दि.०३/०२/२०१८ रोजी महामंडळाचे आदेश जा.क्र. वनाविजाभज / प्रशा/ ५५५ / २०१८ नुसार करण्यात आली होती व पुन्हा त्यांना जिल्हा व्यवस्थापक या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. सदरी आदेशाविरुध्द प्रताप पवार यांनी डब्लूपी / ४६७९ / २०१८ (CNR NO. HCBM010071982018) हायकोर्ट मुंबई येथे दाखल केली. सध्या ते महामंडळाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असून ते सदरील याचीकेमध्ये स्वतः अर्जदार व गैरअर्जदार आहेत. त्यामुळे निकाल त्यांच्याच बाजुने लागेल व शासनाची दिशाभुल केल्या जाईल. प्रताप पवार हे व्यवस्थापकीय संचालक पदाचा

गैरवापर करत असुन रोजंदारी कर्मचारी यांच्याकडुन मुख्यालयातील रोजंदारी कर्मचारी यांच्या माध्यमातून पी.एफ. कपात चालु करण्याकरिता सर्व १०४ कर्मचारी यांच्याकडुन ५ हजार प्रत्येक जमा केले आहेत. परंतु पी. एफ. रक्कम जमा केली नाही.

तसेच महामंडळाच्या स्टेशनरी छपाई मध्ये बोगस व एकाच दुकानदाराकडुन वेगवेगळ्या नावाचे दोन तीन कोटेशन घेवून ६० ते ७० लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे.

लातूर विभागामध्ये वडीलांच्या मत्यु नंतर मलांना अनुकंपावर घेणे येथपर्यंत ठिक आहे परंतु गायकवाड नामक त्याचे मुलाचे मत्यु नंतर त्यांचे आईला वंशपरंपरागत पैसे घेवुन अनुकंपावर नौकर भरती करून पवार यांनी खुप मोठया प्रमाणात भष्टाचार केलेला आहे.

या विषयी २१/०८/२०२५ रोजी पत्र व्यवहार करून कळविले होते परंतु आपणाकडुन कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मी दिनांक १६/०९/२०२५ पासुन आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषणास बसणार आहे तरी दिनांक १६/०९/२०२५ पुर्वी सदर प्रताप पवार यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती प्रशासनाला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरची प्रत माहितीस्तव मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबई यांना दिलेली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *