
करमाळा प्रतिनिधी
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो. त्याच प्रमाणे स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या नंतर स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी फूल तसेच भेटवस्तू देऊन तसेच सुंदर असे ग्रीटिंग कार्ड बनवून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी मार्गदर्शन केले.
