करमाळा प्रतिनिधी

जेऊर ता. करमाळा येथील हर्षवर्धन पांडुरंग वाघमारे याने नीट परीक्षेत यशस्वी होऊन पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित केल्या बद्दल त्याचे जेऊर तालुका करमाळा येथे आमदार कार्यालय आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले असून त्याची डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. हर्षवर्धन याचा मोठा भाऊ उदयराज हा देखील डेरवन चिपळूण जिल्हा

रत्नागिरी येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करीत आहे. एकच कुटूंबातील दोघेजण एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. हर्षवर्धन हा भारत हायस्कूल जेऊर येथील मल्लखांब प्रशिक्षक आणि मध्यामिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा सचिव आणि पांडुरंग वाघमारे यांचा मुलगा आहे. त्याने हे यश मिळविल्या बद्दल लातूर येथील आर सी सी क्लास चे प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी ही सत्कार केला. त्याच्या या यशाबद्दल आमदर नारायण आबा पाटील, पंचायत समिती सभापती अतुल भाऊ पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, युवा नेते व जेऊर सरपंच पृथ्वीराज पाटील, राजू आणा पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष राजूशेठ गादिया, सचिव प्रा. अर्जुनराव सरक, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल तळेकर, जेऊर हायस्कूल मधील शिक्षक, पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *