
करमाळा प्रतिनिधी
रोडकींग पाणीदार आमदार नारायण (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेसाठी करमाळा तालुक्यातील ग्रंथालय चळवळीतील अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रंथपाल या सर्वांनी मिळून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील सर्व ग्रंथालयाला महाराष्ट्रातील एकमेव आमदार असतील की, पहिल्या एक वर्षात करमाळा तालुक्यातील सर्व 50 ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी त्यांच्या निधीतून दहा लाख रुपये निधी मंजूर केला व पुढील काळास प्रत्येक वर्षी निधी देऊ असा शब्द दिला व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असा शब्द दिला त्यामुळे करमाळा तालुक्याच्या वतीने आमदार यांचे खूप खूप अभिनंदन.

त्यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा ग्रंथालयात संघाचे संचालक प्रमोद बेरे, संतोष पाटील, डॉ. अशोक शेळके, सरडे सर, विठ्ठल वरकडं, गणेश पवार, तरंगे, नवनाथ जानकर, दत्तात्रेय घोडके, ठोंबरे, रामभाऊ गायकवाड, विनोद शिंदे, अशोक पाटील, किरण पाटील, महादेव इंगळे, सोमनाथ गरदडे, भास्कर पवार, आवटे व सर्व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.