
कोर्टी प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मरवडे ता.मंगळवेढा यांच्याकडून स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रशालेचे केंद्रीय मुख्याध्यापक विशाल शहाणे यांनी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवार, धनश्री उद्योग समुहाचे प्रमुख प्रा.शिवाजी काळुंगे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, कवी इंद्रजित

भालेराव या मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी शिक्षक संतोष महाडीक, शिक्षिका दिपाली साळुंके, प्रियांका डहाळे, संगिता भंडारे उपस्थित होते. शाळेतील वृक्षारोपण, त्यांची निगा, स्वच्छ शालेय परिसर, संरक्षक भिंतीवरील सुविचार, वर्ग सजावट, संगणक व्यवस्था, वर्ग सजावट, सुंदर प्रवेशद्वार उत्कृष्ट झालेले स्नेहसंमेलन या सर्व बाबी मुळे शाळेला पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेचे गटशिक्षणाधिकारी जयंत नलवडे, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख आदिनाथ देवकाते, सरपंच भाग्यश्री मेहेर, उपसरपंच पुष्पा जाधव, मेजर हनुमंत जाधव, शाव्यअध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.
