करमाळा प्रतिनिधी

           करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांच्या पत्नी सविता संजयमामा शिंदे, मुलगी यशश्री संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात गावोगावी महिलांच्या मदतीने प्रचार दौरा सुरू केला असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांच्या दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून छत्तीस गावामध्ये संजयमामा शिंदे यांचे सुपुत्र यशवंत भैय्या शिंदे, सून गार्गी शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून माढा पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज शिंदे यांनी करमाळा शहरात पदयात्रा काढत मतदारांना विजयी करण्याचे आज आवाहन केले.

             आमदार शिंदे यांना करमाळा शहरातून मताधिक्य देण्यासाठी संजय बापू घोलप, गणेश भाऊ चिवटे, नागेश दादा कांबळे, कन्हैयालाल देवी, प्रवीण आबा जाधव या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून ‘होम-टु-होम’ प्रचार करण्यावर भर देण्यात येत आहे. परवा शहरांमध्ये केलेल्या जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर होम टू होम प्रचारावर भर दिल्यामुळे सफरचंद हे चिन्ह घरोघरी पोहोचले आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारातील या मुसंडीमुळे शहरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे.

         करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी गावभेट दौरे काढण्यावर भर दिला आहे. रोज सायंकाळी एक सभा व दिवसभर कॉर्नर बैठकांचे त्यांचे सत्र सुरु आहे. नागेश कांबळे, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप व गणेश चिवटे यांच्या पाठींब्यानंतर वातावरण फिरले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून पदयात्रा काढून होम टू होम प्रचार केला जात आहे. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील प्रचार दौऱ्यात नागरिक संघटनेचे कन्हैयालाल देवी, विवेक येवले, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, जगदीश अग्रवाल, रितेश कटारिया, अभिषेक आव्हाड, अशपाक जमादार, प्रफुल शिंदे, नाना मोरे, दिग्विजय घोलप, संगीता नष्टे आदी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *