करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये गटातटाच्या राजकारणामुळे तालुक्याचा विकास खुंटला असून, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या. करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करू, असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष गफूर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, मायाताई झोळ मॅडम, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
तालुका उपाध्यक्ष सुहास काळे-पाटील, भिमराव ननवरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते यशवंतराव गायकवाड, श्रीकांत साखरे-पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये मकाईचे माजी संचालक सुभाष शिंदे आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर सर म्हणाले की, करमाळा तालुक्याचा विकास झाला असे लोकप्रतिनिधी व प्रस्थापित नेते म्हणत आहेत
परंतु रस्ते, पाणी, वीज हे प्रश्नही यांना सोडवता आले नाही. शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबत करमाळा तालुका अत्यंत मागास असून शिक्षणासाठी, रोजगारसाठी वैद्यकीय उपचारासाठी, करमाळा तालुक्यातील जनतेला बाहेरगावी जावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग निर्मिती करणे हे माझे प्रमुख ध्येय असून करमाळा
तालुक्यातील सर्वांगीण विकाससाठी मी काम करणार आहे. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे मराठा समाजातील मुलांना कुणबी दाखले मिळाले. हे दाखले मिळाल्यानंतर अनेकांना शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु जात पडताळणी मुदतीत असल्यामुळे अनेकांचे प्रवेश रखडले होते. आपण ही बाब शासनाच्या लक्षात आणून देऊन ०६ महिने मुदत वाढवून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. शैक्षणिक समानतेच्या धोरणावर मी ०७ जी.आर. शासनाकडून पाठपुरावा करून काढले असून, मराठा ओबीसी, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना त्यामुळे न्याय मिळाला आहे.
…………
करमाळा तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली प्रस्थापित नेते मंडळींनी जनतेला भुलथापा मारुन दिशाभूल करण्याचे काम केले असून, विकास नुसता कागदावरच झाला आहे. करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून भिगवण सारख्या ठिकाणी शैक्षणिक संस्था उभा करून आपले कर्तुत्व सिद्ध केलेल्या प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून द्या. असे आवाहन “शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ आण्णा कांबळे” यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य भाव देण्यासाठी त्यांची बिले मिळून देण्यासाठी प्रस्थापित विरोधी आंदोलन करून, त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने विकास हवा असेल तर मला आपण करमाळा तालुक्याच्या आमदारपदी निवडून द्यावे. करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ठाम मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, करमाळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर प्रा. रामदास झोळ सर यांच्यासारखा आमदार होणे काळाची गरज आहे. त्यामुळे आपण गटातटाच्या पक्षीय राजकारणाला बळी न पडता करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. प्रा. रामदास झोळ सरांकडे गुणवत्ता, मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा सर्व गोष्टी असताना केवळ सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र या नात्याने करमाळा तालुक्यासाठी ते निवडणूक लढवीत आहे. त्यांना आपण एक वेळ निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी. करमाळा तालुक्याचा कायापालट ते नक्कीच करतील असा विश्वासही दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केला आहे. करमाळा तालुक्यातील बोरगाव या गावांमध्ये प्रा. रामदास झोळ सर यांचे ग्रामस्थांच्यावतीने हलगी नाद करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवले यांनी केले. तर मान्यवरांचे आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी व्यक्त केले.