करमाळा प्रतिनिधी

पंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांचे वतीने देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा माढा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे हे होते प्रमुख मान्यवर गटविकास अधिकारी मनोज राऊत व यशकल्याणी परिवारचे अध्यक्ष गणेश करे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक

गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 17 केंद्रातून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षक आदर्श केंद्रप्रमुख आदर्श मुख्याध्यापक आदर्श विषय तज्ञ आदर्श विस्ताराधिकारी यांना करमाळा तालुक्याचे आमदार संजय

मामा शिंदे, व गणेश करे पाटील यांचे हस्ते पुरस्कार  देण्यात आले. यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील शिक्षकांचे कौतुक केले. करमाळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे काम आदर्शवत असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत याचे

मला तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने  आनंद वाटतो. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी राबविलेला उपक्रमाची नोंद राज्यात नव्हे तर देशात उल्लेखनीय नोंद झाली असे उद्गार आमदार संजय मामा शिंदे यांनी काढले. यावेळी शिक्षण विभाग पंचायत समिती यांचे वतीने एक कार्यक्षम व लोकप्रिय अधिकारी पदावर काम पाहिलेले गटविकास अधिकारी मनोज राऊत नुकतीच धाराशिव येथे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन या पदावर झाल्याने त्यांचा सहकुटुंब सत्कार आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व गणेश करे पाटील यांनी तालुक्यातील शिक्षकांचे काम उल्लेखनीय असून विशेष उपक्रमांची नेहमी दखल घेतली जात आहे. सर्व शिक्षकांच्या वतीने यावेळी केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, जि. प. सदस्य राणीताई वारे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, पंचायत समिती सदस्य राहुल सावंत, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष  जमादार, विकास सोसायटी चेअरमन सुजित बागल, पत्रकार विवेक येवले, पत्रकार परदेशी पत्रकार चेंडगे, देवीचामाळ ग्रामपंचायत सरपंच यावेळी उपस्थित होते. आभार मिनीनाथ टकले विस्तार अधिकारी, स्वागत नितीन कदम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख निशांत खारगे, अमृत सोनवणे, वैशाली महाजन, रमाकांत गटकळ, संजय मुंडे, संतोष पोतदार, बी. आर. सी. डी. डी. जाधव, अशोक माने, रहीम शेख, गणेश मुंडे, शेंबडे आदलिंग, विषय तज्ञ सर्व केंद्रप्रमुख व हरीश कडू व अंजली निमकर ग्रामपंचायत कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *