करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या रावगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणारे मौजे रावगाव व परिसरातील वाघमारे वस्ती, शेळके वस्ती, धगटवाडी इ. ठिकाणी मा.आ. जयवंतराव जगताप यांनी आमदार असताना व त्यानंतरही झुकते माप देत कोणताही गवगवा न करता कोट्यावधी रुपयांची विकास कामे केलेली आहेत. विधानसभेच्या

प्रचारा दरम्यान भरसभेत शेकडो गावकऱ्यांच्या समोर मा. आ. जयवंतराव जगताप यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समोर दिलेल्या शब्दामुळेच नुकताच वाघमारे वस्ती येथील रस्ता मंजूर झाला असून काही दिवसात त्या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे भाऊंनी दिलेल्या शब्दास मुर्त स्वरूप मिळत आहे. या अगोदर या गावात मा. आ. जयवंतराव जगताप यांनी आमदार असताना त्यांनी केलेल्या शिफारसीमुळे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जलस्वराज्य व हरियाली योजना एकाच वेळी राबवणारी रावगाव ही एकमेव ग्रामपंचायत  ठरली. तसेच  विवीध सभामंडप, गावअंतर्गत रोड, विहीरी, घरकुले, इ. कोट्यावधी रुपयांची विकास कामे त्यांनी केली आहेत. तसेच सध्या काम चालु असलेल्या जलजीवन मिशन पाणीपूरवठा योजना व महावितरणच्या सबस्टेशन च्या कामाच्या मंजूरीतही जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. सत्ता असो वा नसो त्यांनी रावगाव व परिसरात विविध विकास कामे केली आहेत. त्यामुळे जगताप यांना मानणारा मोठा वर्ग गावात असून सदैव निष्ठेने त्यांच्या सोबत आहे असे मत रावगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बुधवंत सर यांनी व्यक्त केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *