करमाळा प्रतिनिधी
श्री बालाजी बहुउद्देशीय संस्था चिखलठाण संचलित न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विविध अंगी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्मान भारत चे योगशिक्षक निळकंठ वाघमोडे सर उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार स्कूल च्या वतीने डॉ. बारकुंड व इतर शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. स्कूलच्या शिक्षिका वाघमोडे मॅडम यांनी योगा
केल्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती होते व आत्मविश्वास वाढतो तसेच योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. योगशिक्षक निळकंठ वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवली व रोज योगा करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या योगसाधनेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन यावेळी योग शिक्षक निळकंठ वाघमोडे यांनी केले. यावेळी शाळेच्या क्रीडांगणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्ण वातावरणात योगाचे धडे योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. यावेळी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेत ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन अर्धचक्रासन, मकरासन, भुजंगासन, पवनमुक्त आसन, प्राणायाम, अनुलोम, भ्रामरी इत्यादी योगासनाचे प्रकार सादर केले. यामध्ये स्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच इतर कर्मचारी यांनी देखील सहभाग नोंदवला.