करमाळा जेऊर

माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा चौदा गावांना भेट देत झंजावती प्रचार, अनेक ठिकाणी भाजप तसेच बागल आणि शिंदे गटातील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी काल शेलगाव (वा), भाळवणी, पांगरे, कविटगाव, सांगवी (बिटरगाव), सातोली, वडशिवणे, मलवडी,

निंभोरे, घोटी, वरकुटे, नेरले, आवाटी, गौंडरे या गावांना भेटी देत थेट मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना माजी आमदार पाटील यांनी करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई, वीज कपात, कांदा निर्यात, रेल्वे, रस्ते आदि प्रश्नांवर भर‌ देत

मतदारांसमोर विकासाचे वास्तव‌ मांडले. सन २०१४ ते १९ मधील आपल्या हातुन झालेली विकासकामे सांगितली. तसेच देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर आता या पक्षाला बळकटी मिळाली असून अनेक गावात इतर गटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले. यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा विजय होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला. नेरले येथील काकासाहेब बळवंत पाटील, बाळासाहेब अण्णा काळे, महेश महादेव‌ अंधारे यांनी बागल गटास तर गणेश मोहन काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. या प्रचार दौऱ्यात सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, केमचे सरपंच अजितदादा तळेकर यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. तर आज माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा माढा तालुक्यातील छत्तीस गावातील मतदारांशी संवाद होणार असून लोणी, मुंगशी, नाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, गवळेवाडी, बारलोणी, अकुलगाव, लहू, चिंचगाव, तडवळे, तांदुळवाडी, सापटणे, शिंदेवाडी आणि घाटणे या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या दौऱ्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून सर्वत्र तुतारीमय वातावरण निर्माण झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *