कुर्डूवाडी जेऊर
छत्तीस गावातील महत्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत, नारायण आबांनी कुर्डुवाडी भागात संपर्क मोहिम राबवावी अशी मागणी एका सुरात कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेऊर ता.करमाळा येथे माजी आमदार नारायण (आबा)
पाटील गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठकांचे सत्र सुरु असुन आज माढा विभागातील कुर्डूवाडी सह छत्तीस गावांना निमंत्रीत केले होते. यावेळी बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नारायण आबा यांनी अपक्ष न उभारता
कोणत्याही एका पक्षात प्रवेश करुन विधानसभेसाठी उमेदवारीचा शब्द घ्यावा. जर सध्याच्या घडामोडीत कोणत्याही पक्षाने लोकभेसाठी उमेदवारी दिली तर ती अजिबात नाकारु नये अशी भावना व्यक्त केली. तर राजाभाऊ शेंबडे यांनी आबांनी
कुर्डुवाडी शहरातील ९१७ मालमत्ता धारकांचा प्रश्न सोडवला, अजून काही मालमत्ता धारकांचा प्रश्न बाकी आहे. ट्रामा केअरचे श्रेय नारायण आबा यांनाच जाते. त्यामुळे आजही जनता आबांवर विश्वास ठेऊन असल्याचे सांगितले. तसेच रोपळे माजी
सरपंच तात्यासाहेब गोडगे यांनी आबांनी आमदार म्हणून दिलेल्या विकास निधीचा पाढा वाचून दाखवला. उपळवाटे येथील हर्षल वाघमारे यांनी पाटील गटाचा जो काही निर्णय असेल त्यानुसार काम करणार असल्याचे सांगितले. तर शेतकरी संघटनेचे राजाभाऊ शिंदे यांनी लोकसभेसाठी अथवा विधानसभेसाठी आबांना आमचा पाठींबा असल्याचे सांगितले. या शिवाय अनेक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. यावेळी आदिनाथ कारखाना माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक दादा पाटील, सभापती शेखर गाडे, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव सरक, पाटील गट प्रवक्ते सुनील तळेकर, राज्य मल्लखांब असोसिएशन सचीव पांडूरंग वाघमारे, बाळासाहेब सरक, आदि उपस्थित होते. प्रास्ताविक एन. पी. सोशल मीडिया तालूका प्रमुख संजय फरतडे यांनी केले तर आभार स्वीय सहायक सुर्यकांत पाटील यांनी मानले.