
मुख्याधिकारी यांच्या शौचालयालाच गळती दुर्गंधी मुळे परिसरातील नागरिक हैराण
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या शौचालयाला गळती लागल्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरली आहे. किल्ला विभागातील नागरिक हैराण झाले आहे खुद्द नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचेच शौचालयाची अशी परिस्थिती असेल तर करमाळा शहरातील सार्वजनिक शौचालयाची काय परिस्थिती असेल शहरातले घाणीचे साम्राज्य यामुळे शहरवासीयांना नरक यातना भोगावे लागतआहे. मुख्याधिकारी यांच्या शौचालयाची दुर्गंधी पसरत आहे याबाबत दुरुस्ती करावी म्हणून किल्ला

विभागातील नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासकीय अधिकारी केव्हातरी येतात त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या कार्यालय तसेच शहराचा कारभार कोणाच्या भरोसे सोडला आहे त्यांना काही माहीत नाही असे नागरिक बोलत आहे.शहरातील व त्यांच्या शौचालयाच्या भिंतीवर स्वच्छ सर्वेक्षण जाहीराती रंगवलेल्या आहेत फक्त नावालाच आहे.तरी मुख्याधिकारी ने त्यांचे स्वतःचे शौचालयाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नगरपरिषद परिसरातील नागरिकांनी केली आहे.
