करमाळा प्रतिनिधी
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240229-WA0043-955x1024.jpg)
उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांची भाजप उद्योजक आघाडी करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तुळजाभवानी मंदिर तसेच अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था तुळजापूर महासंघाच्यावतीने सत्कार. करमाळा प्रतिनिधी उद्योजक श्री संतोष काका कुलकर्णी आणि परिवार यांचे तुळजाभवानी मंदिर तुळजापुर आणि अखिल ब्राह्मण समाज तुळजापूर यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/03/school-1024x625.jpeg)
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा चे अध्यक्ष आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची भा ज पा उद्योग आघाडीचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे.संतोष काका कुलकर्णी हे एक यशस्वी उद्योजक आहेत.त्यांनी कोणाचाही पाठबळ नसताना आपल्या अनुभवाचा जोरावर लुब्रिकेंट ऑईलचे युनिट करमाळा औद्योगिक वसाहतीत उभारलेले आहे.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/02/WhatsApp-Image-2024-02-28-at-20.18.021.jpeg)
त्यानी करमाळा तालुक्यातील सर्व समाजतील होतकरू तरुणांना बँकेद्वारे कर्जे देऊन उद्योजक होण्यासाठी सहकार्य केले आहे व करत आहेत.
याच कामाची दखल घेऊन त्यांची करमाळा उद्योग आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.ते नक्कीच या पदास न्याय देतील नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा असा त्यांचा आग्रह असतो .उद्योजक होऊन इतरांना रोजगार द्या असे त्यांचे मत आहे.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/02/kamal-682x1024.jpeg)
अशा संतोष काका कुलकर्णी राजुरीकर करमाळा यांचा सत्कार करताना विशेष आनंद होतो आहे असे प्रतिपादन ब्राह्णण समाज तुळजापूर चे श्री सुदेश काका जेवळीकर, जिवोतम जेवळीकर प्रणव जेवलीकर,सुधीर कुलकर्णी प्रयाग पाठक, नीलोत्तम जेवळीकर आंबुलगे अभिषेक जेवळीकर. माणिक कांबळे निवृत्त तहसीलदार श्री श्यामकांत जेवळीकऱ साहेब यांनी श्री संतोष काका कुलकर्णी यांचा विशेष गौरव केला.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2024/02/isha-1024x1024.jpeg)
यावेळी वै. वनमाला बबनराव वैद्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ चे संस्थापक अध्यक्ष तसेच नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य या कार्यक्रमास उपस्थित होते.
![](http://kamlainagari.in/wp-content/uploads/2023/05/jrd-जाहिरात.jpeg)