जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश (भाऊ) चिवटे यांच्या कामाचा धडाका ९ रस्त्यासाठी आणखी ८५ लाख रु निधी मंजूर

करमाळा :- सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश (भाऊ) चिवटे यांच्या विकास कामाचा धडाका सध्या करमाळा तालुक्यात जोमात सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व
माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन मधून काल परवाच धायखिंडी-करंजे रस्त्याच्या ७५ लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. या नंतर लगेच करमाळा तालुक्यातील आणखी ९ रस्त्यासाठी तब्बल ८५ लाख रु निधी त्यांनी खेचून आणला आहे यामुळे तालुक्यात

सध्या त्यांच्या कामांचा बोलबाला झाला आहे.या ९ रस्त्यामध्ये विट येथील गावडे वस्ती रस्ता १० लाख रु,कुंभेज येथील भोसले वस्ती रस्ता १० लाख रु,हिसरे सालसे(२) रस्ते २० लाख रु,बिटरगाव श्री येथील भोसले वस्ती बंधारा रस्ता १० लाख रु,पोथरे येथील पोटेगाव रस्ता १० लाख रु व बोरगाव रस्ता ५ लाख रु,मिरगव्हाण येथील जुने गावठाण ते पाटील वस्ती रस्ता १० लाख रु,देवळाली येथील बादाळे वस्ती रस्ता १० लाख रु. इत्यादी रस्त्यासाठी तब्बल ८५ लाख रु.निधी श्री चिवटे यांनी खेचून आणला आहे.या भागातील रस्ते वर्षानुवर्षे नादुरुस्त होते.खुप खराब असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना दळणवळणासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या आता या समस्या दूर होणार आहेत.यामुळे श्री चिवटे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *