गोशाळा चालकांचे दोन दिवशीय राज्यस्तरीय शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी

गोशाळा चालकांचे दोन दिवशीय राज्यस्तरीय शिबीर १ व २ ऑक्टोबर, रोजी कात्रज येथील जैन मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात महाराष्ट्रातील सर्व गोशाळा, विश्वस्त, संचालक आणि पांजरापोळचे प्राणीप्रेमी यांच्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यशाळेत मुख्यत्वे करून जीवांच्या आधारित सेंद्रिय शेतीद्वारे गोशाळांचे

पुनरुज्जीवन व स्वावलंबन कसे करता येईल? याविषयी देशातील विविध प्रबुद्ध वर्गाद्वारे मार्गदर्शन केले गेले. गाई उत्पादनांचे स्टॉल्सही उपलब्ध करण्यात आले होते, ज्यामध्ये गोनेल, धूपबत्ती, गोबर गमला, पेन स्टैंड, फुल दांडी, पंचगव्य, नस्य आदी वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले होते.
समस्त महाजन या संस्थेचे महाराष्ट्र गोसेवा आयोगा तर्फे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित पूज्य आचार्य चंद्रभाता सागर महाराज त्यानंतर समस्त महाजन या संस्थेचे गिरीशभाई शहा, गिरीशभाई सत्रा, परेशभाई शहा, रमेशभाई ओस्वाल तसेच उत्तर प्रदेशचे आयोगाचे माजीअध्यक्ष गुप्ता तसेच माझे स्नेही राजेंद्र लुंकड आणि खास करून गिरीजीच्या

आणि आमच्या सांगण्यावरून तिथे उपस्थित झालेले पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे लक्ष काय असणार त्याच्या घटनेवर काय कार्य करणार आहेत. त्याला 7G विभाजित करण्यात आले आहे. ते म्हणजे गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोशाळा, गोरक्षक, गोमुल्यवर्धन आणि गो आधारित शेती. संस्थांचे स्वावलंबन, गोवंश संस्कृतीची पुनरस्थापणा, गाईवर आधारित विकास, गाईवर आधारित शेती, आरोग्य व पर्यावरण बाबत जनजागृती, गायीचे संगोपन, या बाबत विविध कायदे करणे यावर विस्तार पूर्वक चर्चा करण्यात आली.


या शिबीरातील सर्व उपस्थित व्यक्तींना, संस्थांना, आणि गोसेवा सेवकांना आणि आपल्या सर्वांनाच आभार मानतोच आहे आणि आपल्या सेवेच्या माध्यमातून गायीच्या संरक्षणात, संवर्धनात, आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सहाय्य करण्यातील आपल्या सतत प्रयत्नांसाठी आभारी आहोतच. 
सोबत आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, डॉ. नितीन मार्कण्डेय, संजय भोसले व उद्धव नेरकर उपस्थित होते.
शेखर मुंदडा 
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग
संस्थापक: महा एनजीओ फेडरेशन
प्रदेश संयोजक: सामाजिक संस्था संपर्क, भाजप 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *