
महात्मा गांधीं विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा अक्कलकोट याठिकाणी पार पडली. या स्पर्धेत महात्मा गांधीं विद्यालय येथील विद्यार्थी सहभागी झाले. मैदानी रनिंग स्पर्धेत महात्मा

गांधीं विद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. 14 वर्षे वयोगट मुले कुमार वेदान्त कानडे या खेळाडूने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत रनिंग व गोळा फेक यात घवघवीत यश प्राप्त केले. संस्थेचे चेअरमन मा. आ.

जयवंतराव जगताप, मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त शंभूराजे जगताप यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे प्रभारी मुख्याध्यापक बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक, पाटिल सर, पर्यवेक्षिका नवले मॅडम, ज्युनियर कॉलेज

विभाग प्रमुख पवार सर यांनी खेळाडूंचे गुलाब पुष्प गुच्छ देउन अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंना पुढिल यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुत्र संचालन तिवाटणे मॅडम यांनी केले.