करमाळा प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबूतर व बकऱ्या चोरल्या असा आरोप करून आरोपी नाना गलांडे, राजू गलांडे, राजू बोरगे, पप्पू पारखे, मनोज बोडके, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य यांनी दलित मुलांना त्यांच्या घरातून उचलून नाना गलांडे यांच्या शेतात नेऊन पाच दलित मुलांना अर्ध नग्न करून दोरीने झाडाला लटकवले व अमानवीय मरेपर्यंत मारहाण केली. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी शेताकडे धाव घेतली त्यातील आरोपींनी दलित कुटुंबातील एका आईला सुद्धा मारहाण
केली.
तसेच सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आरोपी दलित मुलांवर अत्याचार करत होते. त्यामध्ये आरोपींनी त्यांच्या अंगावर लघवी केली, अंगावर थुंकत होते व ते चाटायला लावत होते असा हा भयंकर प्रकार आपल्या पुरोगामी म्हणावणाऱ्या महाराष्ट्रात घडत आहे ही बाब निंदनीय आहे.
या गावांमध्ये दहशतीच वातावरण आहे सदरील आरोपींनी सावकारकितून माया गोळा केली जमिनी हडप केल्या असे स्टेटमेंट खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल आहे. यावरूनच घटनेची दाहकता समजते म्हणून सदरील आरोपींना तात्काळ अटक करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)युवक आघाडीच्या वतीने जिल्हा भर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हंटले
आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे. प्रसेंजित कांबळे, मातंग एकता आंदोलनचे शरद पवार, युवराज जगताप, नितीन दामोदरे, अमोल गायकवाड, धनराज सरोदे, सचिन गायकवाड, नवनाथ भालेराव, संतोष भालेराव, आजिनाथ भोसले, रंजीत कांबळे, मयूर कांबळे, अभिजीत माने, सुरज कांबळे, सिद्धार्थ
भोसले, आजिनाथ टेंबाळे, राहुल शिंदे, कमलेश दामोदर, बाळू कांबळे, मुन्ना कांबळे, युवराज कटारे, गणेश कांबळे आदी जण उपस्थित होते. यावेळी मातंग एकता आंदोलन यांनी जाहीर पाठिंबा दिला.