ऊस बिल मिळण्यासाठी शेतकऱ्यांची शुक्रवारी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे बैठक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे

करमाळा प्रतिनिधी  

मकाई, कमलाई, घागरगाव साखर कारखान्यांनी उसाची बिले थकवलेली आहेत बिले मिळण्यासाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह करमाळा येथे दि. ११/८/२०२३ शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे. सदर बैठकीमध्ये ऊस बिल थकलेल्या

शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार करण्यात येणार आहे व सदर यादी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे उस बिल न मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांनी करमाळा येथे कोर्टाच्या शेजारी शासकीय विश्रामगृह करमाळा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या नावाची नोंद करावी

बैठकीला मार्गदर्शन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम करणार आहेत व सर्वांच्या विचाराने पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

दि.११/८/२०२३ शुक्रवारी सकाळी ठीक – ११:०० वाजता नाव नोंदणी व बैठकीला सुरुवात होईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व बैठकीला वेळेत उपस्थित राहावे असे आव्हाहन लालासाहेब काळे, सुंदरदास काळे, दत्ता गव्हाणे, राजकुमार देशमुख, संदीप मारकड पाटील, निलेश पडवळे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *