राष्ट्रीय नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कु.निलीमा चव्हाण हत्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंञी देंवेद्र फडणविस यांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी
ओमळी ता.चिपळुण जि.रत्नागीरी येथील नाभिक कुटुंबातील कु.निलीमा सुधाकर चव्हाण ही दापोली येथे स्टेट बॅंक आॅफ इंडीया शाखेमध्ये नोकरीला होती. दि.२९जुलै रोजी ती राहत्या घरी जाण्यासाठी एस टी बसने निघाली असता ती घरी पोहचलीच
नसल्यामुळे तिच्या कुटुंबाने शोधाशोध सुरु केली.पण तिचा शोध न लागल्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार दिली.तरी पण दोन दिवसानी तिचा मृत देह दोभोळ ता.दापोली येथे डोक्यावरील केस तसेच भुवया काढलेल्या भयानक अवस्थेत मिळाला.
तिचा मृतदेह ज्या अवस्थेमध्ये मिळाला असता घातपात झाला असावा अशी शक्यता जास्त आहे. अत्याचार करुन तिचा मृतदेह अशा प्रकारे विद्रूप करुन खाडी मध्ये फेकुन देण्यात आला का ? याचाही तपास होणे गरजेचे आहे.तथापी आधी पासुनच ऊदासीन असलेल्या दापोली पोलीसकडुन योग्य प्रकारे तपास होताना दिसुन येत नसल्यामुळे ७ दिवस होणुनही अजुन त्यांना गुन्हेगार शोधन्यास अपयश आले आहे.
ही गंभीर बाब लक्ष्यात घेता या गुन्हयाचा तपास स्वतंञ तपास यंञणे मार्फत होण्याचे आदेश तत्काळ देण्यात यावेत.तसेच आरोपीस तत्काळ अटक करुन हा खटला फास्टट्रक कोर्टात चालुन ऊज्जवल निकम यांना सरकारी वकील नेमुण आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा कशी होईल या साठी सरकारने प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात आली.
तसे न झाल्यास दि१५ आॅगस्ट २०२३ रोजी राज्यभर लोकशाही पध्दतीने अंदोलन केले जाईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा राष्ट्रीय नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी या वेळी दिला.
सदर निवेदन प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार किरण कदम यांनी स्विकारले यांना या विषयी आपले निवेदन व आपल्या भावना वरीष्ठाना तत्काळ पाठवुन देतो असे या वेळी सांगीतले.
या विषयी भाजपा युवा मोर्चा माढा तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष ऊमेश पाटील व बालाजी गायकवाड यांनी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाअध्यक्ष सागर लोकरे, शहर अध्यक्ष सागर बंदपट्टे यांच्या सह सर्वांनी या वेळी पाठींबा दिला.
या वेळी रामदास राऊत,संजय गाडेकर महाराज,वैजिनाथ राऊत,भारत चौधरी,गणेश भालेकर,कुमार दळवी,संतोष गाडेकर,औंकार गाडेकर,तेजस गाडेकर,राजु सावंत,अजय काशिद यांच्या सह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.