करमाळा प्रतिनिधी
मणिपूर येथील हिंसाचाराच्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा तसेच संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा म्हणून या मागणीसाठी तहसील कचेरी करमाळा समोर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष
राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळेस राजाभाऊ कदम आपल्या भाषणातून म्हणाले, तीन महिने झाले मणिपूर मधील हिंसाचार चालू आहे, हजारो घरे
जाळली, हजारो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोकांच्या आया बहिणीची इज्जत लुटली, तीन महिलांची नग्न करून हजारोच्या संख्येने धिंड काढून बलात्कार केले त्यातील एक महिला कारगिल युद्धातील माजी सुभेदाराची पत्नी होती. या सर्व घटनेमुळे
जगामध्ये भारत देशाची मान खाली गेली आहे. एवढं सगळं घडून मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही ? तेव्हा पंतप्रधानांनी ताबडतोब मणिपूर मध्ये बीरेनसिंह सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरले गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्या. माजी सैनिकाची पत्नी या देशात सुरक्षित राहू शकत नसेल तर या देशांमध्ये जंगल राज चालू आहे असे वाटते कारण हिंसा करणाऱ्या लोकांच्या हाता मध्ये बंदूक होत्या बंदुकांच्या गोळ्यांनी अनेक लोकांचे प्राण घेतले. हिंसा रोकण्यामध्ये केंद्र सरकार सुद्धा आपयशी ठरले आहे.
संभाजी भिडे भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याचा आवमान करतात. महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवा बरोबर शिर्डीचे साईबाबा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करतात यामुळे सर्व समाजामध्ये भिडे विरोधात संतापाची लाट निर्मान झाली आहे. संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.
या वेळेस मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव आप्पा भोसले, हनुमंत खरात यांची भाषणे झाली. निवेदन नायब तहसीलदार निकम साहेबांनी स्वीकारले.
यावेळी उपस्थित पोंधवडीचे सरपंच कोडलिंगे, पोत्रेचे मा. सरपंच विष्णू रंधवे, उमरडचे माजी सरपंच संदीप पाटील, रेवण पाटील, शहाजी झिंजाडे, बहुजन संघर्ष सेनेचे तालुकाध्यक्ष अंगद लांडगे, करमाळा शहराध्यक्ष अजिनाथ कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे शहर सचिव कालिदास कांबळे, बहुजन संघर्ष सेनेचे तालुका उपाध्यक्षा तुकाराम घोंगडे, काँग्रेसचे भगवान डोंबाळे, गफूर भाई शेख, सुनील गरड, मारुती भोसले, महादेव भोसले, सचिन चितारे, कचरू जगदाळे, महिंद्रा जगदाळे, अधिक शिंदे, निखिल गरड, राहुल गरड, नागा कांबळे, बापू भोसले, सुरेश जाधव, राहुल खरात, संतोष चव्हाण, प्रेमचंद कांबळे, अंकुश जाधव, रामा पांडव, बटू हजारे, कालिदास लुचारे, मच्छिंद्र काळे, मच्छिंद्र गायकवाड, राजू शिंदे, निवास चौधरी, लियाकत शेख, भागवत कदम, आबा कदम, रमेश कदम आधी शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.