सोलापूर प्रतिनिधी
नरेगा योजने अंतर्गत केळी, द्राक्षे, डाळिंब या फळबाग लागवडी संदर्भात शेतक-यांना येणाऱ्या अडचणी याविषयी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दि.१/८/२०२३ रोजी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली.
त्याबरोबरच शेलगाव(वां) ता. करमाळा येथे वेळोवेळी मागणी करण्यात आलेल्या केळी संशोधन प्रशिक्षण व निर्यात सुविधा केंद्र या बाबत देखील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व धोरणात्मक निर्णयाच्या दृष्टीने माहिती घेतली.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहकार्य कसे करता येईल याविषयी सर्वांकडून मते जाणून घेतली. त्यादृष्टीने काम करण्याबाबत सूचना आ.मोहिते पाटील यांनी केल्या. यावेळी मा.आ. नारायण पाटील, सवितादेवी राजेभोसले, शिवाजीराजे कांबळे, अजित तळेकर, भारत नाना पाटील, महेंद्र पाटील, अमरजित साळुंके, दीपक देशमुख, मिलिंद पाटील आदींसह केळी, द्राक्ष, डाळींब, ऊस उत्पादक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शंकरनगर (अकलूज) येथील सहकार महर्षी साखर कारखान्याच्या कार्यालयातील उदय सभागृहात ही बैठक झाली. याच ठिकाणी नंतर पाणंद रस्ता या विषया संदर्भातही संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबतही आवश्यक माहिती घेऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सूचना केल्या. बैठकीस प्रामुख्याने कृषी, बांधकाम, महसूल सह अन्य विभागाचे जिल्हा पातळीवरील व तालुका पातळीवरील शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.